Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते बाराशे लाभार्थ्यांना गॅस शेगडी वाटप

team by team
September 26, 2022
in राजकीय
0
खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते बाराशे लाभार्थ्यांना  गॅस शेगडी वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाने येथे  परिसरातील अकराशे पंचवीस लाभार्थ्यांना विकास पर्व प्रधानमंत्री उज्वला-२ योजनेअंतर्गत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजना तळागाळातील महिलापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच महत्त्वकांक्षी उज्ज्वला योजना २ ही बंद पडलेली पुन्हा सुरू करून चुलीवर स्वयंपाक करायला महिलांना घरधुरमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न आहे व उर्वरित महिलांनी डिसेंबर अखेर पर्यंत गॅस जोडणी योजना सुरू राहणार आहे
.बचत गटातून माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून महिला सक्षम व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल तसेच वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्या मेट्रो सिटीमध्ये विक्री करून महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्रातून योजना आणत तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावित यांनी केले.
शहादा तालुक्यातील मंदाने येथे  परिसरातील अकराशे पंचवीस लाभार्थ्यांना विकास पर्व प्रधानमंत्री उज्वला-२ योजनेअंतर्गत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंद पाटील, भाजपाचे डॉ.कांतीलाल टाटीया, जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगलाबाई जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम भामरे, नवनिर्वाचित  सरपंच सुशीला भील, सोनवद सरपंच राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते रमाशंकर माळी, शरद साळुंखे, विश्वासराव पवार, ओंकार पवार, नारायण पवार, रावाबिल धरमसिंग पावरा, कमलबाई भिल, इंदुबाई भील, सविता बिरारी, सरलाबाई भिल, इंदुबाई देवरे, मंगलाबाई सैंदाणे, केदार गिरासे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.कांतीलाल टाटीया म्हणाले की, केंद्र शासना कडून वेगवेगळ्या योजना खासदार हिना गावित यांच्या माध्यमातुन घरोघरी स्वयंपाकासाठी गॅस शेगडी  पोचवण्याचे कार्य सुरू आहे आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना गॅस  कनेक्शन मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक मंदाने येथील माजी उपसरपंच तथा गॅस एजन्सी संचालक अनिल भामरे  म्हणाले, राजकीय विरोधकांनी केंद्राच्या अनेक विकासाच्या  योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला मात्र  यशस्वी झाल्या नाहीत.जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात यासाठी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे.
बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सन्मानासाठी शासनाने अनेक योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न गावित परिवाराकडून सातत्याने होत आहे कार्यक्रम मंदाने सह परिसरातील अकराशे पंचवीस लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदाने येथील युवा मंच व गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापुर भाजपाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

Next Post

पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते दुष्काळ अनुदानासाठी बॅकेला दिला सहा कोटीचा धनादेश

Next Post
पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते दुष्काळ अनुदानासाठी बॅकेला दिला सहा कोटीचा धनादेश

पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते दुष्काळ अनुदानासाठी बॅकेला दिला सहा कोटीचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add