नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथे दारूच्या नशेत घरगुती भांडणावरून गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथे अविनाश जेमा पाडवी हा दारूच्या नशेत असतांना त्याची पत्नी टिना पाडवी हिचासोबत भांडण झाले. याचा राग येवून घरगुती भांडणाचा कारणावरून अविनाश पाडवी याने टिना अविनाश पाडवी (३३) हिचा गळा आवळून पाठीवर चेहर्यावर दोन्ही पायांवर मारहाण करून तिला जिवेठार केले.
याप्रकरणी गुलाबसिंग भामटया वसावा रा.करोड (ता.उच्छल,गुजरात) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अविनाश जेमा पाडवी रा.देवमोगरा (ता.नवापूर) याच्या विरूध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत.