नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा -प्रकाशा रस्त्यावरील लांबोळा मनरद दरम्यान शहाद्याकडे जाणार्या बैलगाडीला मागुन येणार्या कंटेनर ने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान या अपघातात बैलाचाही मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा -प्रकाशा रस्त्यावरील लांबोळा मनरद दरम्यान आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतमजुर हारसिंग सरदारसिंग गिरासे (वय.४५) हा शेतात बैलगाडी घेवुन जात असतांनामागुन येणाराा कंटेनर ( जे.जे.३८, टि.६६७७) ने बैलगाडील धडक दिली . या अपघातात हारसिंग सरदारसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला. हारसिंग सरदारसिंग गिरासे हे नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे येथील रहिवाशी असुन गेल्या १८ वर्षांपासुन ते लांबोळा येथे शेतमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते.त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, एक मुलगा, दोन मुली, एक जावाई, असा परिवार आहे.दरम्यान या अपघातात बैलाचाही मृत्यू झाला आहे.