शहादा | प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने परिसरातील नाल्यांना पूर येत आहेत. तालुक्यातील पाडळदा येथील नाल्यालाही मोठा पूर आला होता. या नाल्यात शेतकऱ्यासह बैलगाडी वाहत वाहत असताना पाडळदा गावकऱ्यांच्या लक्षात आले असता त्यांनी वेळीच उपाययोजना करून बैलगाडीचा शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेत एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती असे की चिखली पुनर्वसन येथील शेतकरी सिताराम बदल्या पावरा हे शेतातून घरी येत असताना अचानक पाडळदा येथील नाल्याला पूर आला या पुराच्या पाण्यात वाहून जात असताना गावकऱ्यांनी उपाययोजना करून सदर शेतकऱ्याला व एका बैलाला वाचवले आहे. परंतु एक बैल खोल पाण्यात बुडल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेने परिसरात हळदळ व्यक्त करण्यात येत आहे अचानक नाल्याला पूर आल्याने ही घटना घडली होती.