Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषि पुरस्कार 2021 साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

team by team
September 24, 2022
in राज्य
0
कृषि पुरस्कार 2021 साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नंदुरबार   l

 

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राज्याचे महामहिम राज्यपाल यांचे हस्ते विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

 

 

दरवर्षी प्रमाणे 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातील शेतकऱ्यांकडून वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार आणि जिजामाता कृषिभुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार हा कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात संघटनात्मक आणि अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास देण्यात येतो. तर जिजामाता कृषिभुषण पुरस्कार हा कृषि क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यास देण्यात येतो.

 

 

पुरस्कारांचे स्वरूप 50 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व सपत्नीक/पतीसह सत्कार. देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या – 8 (प्रत्येक कृषि विभागातुन 1 याप्रमाणे )

 

 

पुरस्कारासाठीचे निकष –

प्रस्तावित शेतकरी यांना केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला असावा. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयांसह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा. प्रस्तावित शेतकरी यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व वापर, काढणी पश्चात व्यवस्थापन, साठवणूक व मूल्यवर्धन, कृषि प्रक्रिया, निर्यात इत्यादी कार्यात सहभागी होऊन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा.  शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष असावे. संबंधित शेतकरी केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा तसेच सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा.

 

प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे

 

7/12 व 8 अ चा उतारा. केंद्र/राज्य शासकीय/ निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसलेबाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र. मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला. संबंधित शेतकऱ्याला मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे इ. पीकस्पर्धा, कृषी प्रदर्शने, संशोधन संस्थांना भेटी इ. उपक्रमात सहभागी झाल्याबाबतचा तपशील सोबत जोडावा.

 

 

 

नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक, मोहन वाघ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पासाठी अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post

तळोद्यातून अल्पवयीन मुलीस पळविले

Next Post
तळोद्यातून अल्पवयीन मुलीस पळविले

तळोद्यातून अल्पवयीन मुलीस पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add