Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता

team by team
September 21, 2022
in राज्य
0
लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

मुंबई   l

 

राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ४९.८३ लाख लस, बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

 

 

श्री सिंह म्हणाले, लम्पी आजार केवळ जनावरांमध्ये आढळून येतो. देशातील आकडेवारीमुळे तसेच समाजमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी.

 

 

लम्पीबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

 

 

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४(१) नुसार जनावरात या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संबंधित माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. गावस्तरावरून अशी माहिती संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांनी न चुकता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयास कळवावी. लम्पी चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घेण्याचे पशुपालकांना आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

लम्पी हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो. सध्या या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र त्यांनी लम्पी रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.

 

 

 

राज्यामध्ये दि. २० सप्टेंबर, २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर हिंगोली व रायगड अशा २७ जिल्ह्यांमधील एकूण १२२९ गावांमध्ये फक्त ११,२५१ जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यापैकी ३८५५ जनावरे उपचाराच्या माध्यमातून रोगमुक्त झाली आहेत.

 

 

 

उर्वरित बाधितांसाठी लसदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. २० रोजी २५ लाख लस मात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगाव १२२, अहमदनगर ३३, धुळे १२, अकोला ५४, पुणे २५, लातूर ५, औरंगाबाद ८, सातारा १५, बुलडाणा २५, अमरावती २९, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम ४, जालना २, ठाणे ३, नागपूर ३ व रायगड १ अशा ३५२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

दि. २० रोजी रोग प्रादुर्भावग्रस्त ८ जिल्ह्यामधील गंभीर जनावरांवर उपचार व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील भीषकशास्त्रातील तज्ज्ञांची १९ पथके नियुक्त करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील ६ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ दररोज सायं ४ ते ५ दरम्यान दृकश्राव्य माध्यमांद्वारे अधिकाऱ्यांना गंभीर प्रकरणांबाबत मार्गदर्शन व उपचारामध्ये मदत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या 1826 कोटींचा ‘मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळा’ करणार्‍या 64 शैक्षणिक संस्थांवर गुन्हे दाखल का होत नाहीत ?

Next Post

धडगाव तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसादामुळे 671 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

Next Post
धडगाव तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसादामुळे 671 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

धडगाव तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसादामुळे 671 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add