नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात अनंत श्री.विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा आज बुधवार दि. 21 सप्टेंबर रोजी व्ही.जी. राजपूत लॉन शहादा बायपास रोड,जाणता राजा चौक नंदुरबार येथे येणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे .
सकाळी दहा वाजेला पादुकांचे आगमन होईल.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक उपक्रम गुरुपूजन झाल्यानंतर आरती सोहळा , प्रवचन उपासक दीक्षा पादुका दर्शन महाप्रसाद पुष्पवृष्टी होईल. नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. या महनमंगलसमयी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा नंदुरबार यांच्याकडून करण्यात आले आहे.








