नवापूर l प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकरावजी गावीत यांचे निधन दि १७ सप्टेंबर रोजी झाले होते.त्यांचा अस्थींचे विसर्जन श्री. क्षेत्र प्रकाशा येथील तापी नदीच्या पवित्र जलात विधीवंत पुजन करुन सुपुत्र माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत यांनी केले.
यावेळी गावीत परिवारातील नगरसेवक गिरीष गावीत,अभियंता रमेश गावीत,विजय गावीत,अजय गावीत,नातु धनजंय गावीत,मानस गावीत,डिंगबर गावीत,राजेश गावीत,प्रविण गावीत,हर्षल गावीत,वैभव गावीत, सौमित्र गावीत,कृणाल गावीत,बबु गावीत,तसेच माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील,प्रकाश गावीत,दिलीप गावीत,अंबादास आतारकर, के.डी.गावीत, मोहन चौधरी,रिबेश गावीत,जयवंत जाधव, दिनेश बिरारी,भालचंद्र पाटील,उच्छलचे माजी सरपंच सखारामभाई गामीत,धुलीपाडाचे माजी सरपंच उमेश गावीत,तसेच धुळीपाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकरावजी गावीत यांच्या निवासस्थानी येऊन माजी आमदार निर्मला गावीत,माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत,नगरसेवक गिरीष गावीत यांचा परिवाराचे सांत्वन केले व कै माणिकराव गावीत यांच्या आठवनीला उजाळा दिला.
यावेळी भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,माजी सभापती विनायक गावीत,शहर अध्यक्ष शरद पाटील,मनोज वळवी,इंद्रीस टिनवाला सह राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी कै.माणिकरावजी गावीत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण श्रध्दांजली अर्पन केली.








