नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील गंगापूर गावाचं ठाणेपाडा मधून विभाजन झाल्यानंतर 30 वर्षा नंतर गंगापूर गावात सत्ता बदल झाले.
येथील माजी जि.प. सभापती दत्तू चौरे यांच्या पॅनल चा पराभव करीत परिवर्तन विकास पॅनलचे प्रमुख दिनेश रमण बागुल यांच्या नेतृत्वात परिवर्तन विकास पॅनलचा विजय झाला. ग्रामपंचायत च्या मतमोजणीत लोकनियुक्त सरपंचपदी निलाबाई बकाराम बागुल तर सदस्य म्हणून कृष्णा मलखाम चव्हाण, ललिताबाई राजु बागुल, मनोहर वामन बागुल, हिराबाई वासू बागुल हे उमेदवार विजयी झाले.विजयानंतर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा प्रणित परिवर्तन विकास पॅनलले विजय मिळविला आहे.विजयानंतर आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.








