नंदूरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्त तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शहादा -तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपा प्रभारी नारायण ठाकरे, दरबार सिंग पाडवी, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश चव्हाण, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, शिरीष माळी, अंबालाल साठे, दीपक कलाल, दीपक चौधरी, लक्ष्मण माळी, जीवन अहिरे, अरविंद प्रधान, यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच डॉक्टर गणेश पवार मेडिकल वैद्यकीय अधिकारी तसेच स्टाफ देखील यावेळी उपस्थित होता.
या पंधरवाड्यामध्ये जनतेला सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, विविध मागण्या, नकाशा यासारखे इतरही जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत, ते सर्व प्रश्न या पंधरा दिवसांमध्ये एका मिशन मोडवर निकाली काढायचे आहेत. या काळात लोकांना पूर्णपणे सेवा द्यायची आहे, यांसह दररोज विविध कार्यक्रम हे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येणार आहे.अश्या प्रकारे हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी तर्फे करणार करण्यात येणार आहे.








