नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ हे धडगांव येथील खडक्या या गावी जाऊन पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्य्क्ष विजय चौधरी यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्हयातील धडगांव तालुक्यातील खडक्या या गावी एक विवाहीत तरुण मुलीवर अत्याचार करुन तिला फाशीवर लावुन तिचा खुन करण्यात आला. याबाबत पोलीसांनी चुकीच्या पध्दतीने गुन्हा नोंदविला तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ.वानखेडे यांनी पोस्टमार्टन रीपोर्ट हा खोटा तयार केला व आरोपींना सहाय्य होईल अशे काम वैदयकीय अधिकारी व पोलीसांनी केल्याने हा विषय अतिशय गंभीर झाला.
या सगळया प्रकरणाच्या तळाशी जाऊन पिडीत मुलीला न्याय देण्याच्या हेतुन भाजपाच्या नेत्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ हे आज दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार येथे येत असुन सकाळी 10 वा. नंदुरबारहुन धडगांव तालुक्यातील खडक्या या गावी जाऊन पिडीत मुलीच्या आई-वडीलांची भेट घेऊन त्यांची सांत्वना ते करणार आहे. तसेच वस्तुनिष्ठ माहिती घेणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय नंदुरबार येथे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर ते पोलीस अधिक्षकांची देखील ते भेट घेणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीदिली आहे.








