नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 75 व शहादा तालुक्यातील 74 अशा एकूण 149 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी रवाना करण्यात येणार आहे.
त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील 75 व शहादा तालुक्यातील 74 निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 17 व 18 सप्टेंबर 2022 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
तसेच निवडणूक क्षेत्रातील मतदार, कामगारांना 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता दोन तासांची सवलत किंवा सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) तथा नोडल अधिकारी ग्रामपंचायत नितीन सदगीर यांनी निर्गमित केले आहे.








