नंदुरबार l
नवापूर एमआयडीसी व उमराण एमआयडीसीतून चोरट्याने दोन टॉवरमधून सुमारे २० हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर एमआयडीसी टॉवर क्र.एनव्हीपीआर ९०४५ येथून चोरट्याने ६ हजार ४०० रुपये किंमतीचे डिझेल व उमराण येथील टॉवर क्र.एनव्हीपीआर ९०१७ येथून ११ हजार ८३३ रुपये किंमतीचे डिझेल असे एकूण १८ हजार २३३ रुपये किंमतीचे डिझेल चोरट्यांनी चोरुन नेले.
याबाबत सुनिल नारायण माळी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधाच भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरधर सोनवणे करीत आहेत.








