नवापूर l प्रतिनिधी
नवापुर येथुन चोरीस गेलेल्या बकऱ्या या मालेगाव येथुन संशयित आरोपीतासह ताब्यात घेवुन पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर येथील साहीद सुपडु फकीर (शहा) यांच्या मालकीची 8 बोकड व 08 बकऱ्या नवापुर शहरालगत असलेले MIDC भागातून अज्ञात चोरट्यानेचोरी करुन नेली होत्या. या बाबत नवापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता नवापुर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार दादाभाई वाघ यांचेकडेस दिला होता.
पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उप अधिक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी
गुन्ह्याचे चक्र जलद गतीने फिरवुन अधिकची माहीती काढुन गुन्ह्याचा छडा लावत मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार रमजानपुरा, मालेगाव जि. नासिक येथील राहणारा अशरफ पिरन शहा हा गुन्ह्यातील बकऱ्या व बोकड असे चोरी करुन घेवुन गेला आहे.
माहीती मिळाल्याने, सहा. पोलीस निरी. निलेश वाघ यांनी तात्काळ एक पथक तयार करुन लागलीच मालेगाव जि. नासिक येथे पाठविले होते. तपास पथाकाने मालेगाव येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीसांनी सदरची माहीती देवुन त्यांच्या मदतीने गौतमनगर, रमजानपुरा, मालेगाव येथील राहणारा अशरफ उर्फ चिन्या पिरन शहा यास त्याच्या घराशेजारी मोठ्या शिताफीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून त्यास गुन्ह्यातील बकऱ्या व बोकड बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याने गुन्ह्यातील चोरी केलेले बकऱ्या व बोकड असे मालेगाव येथील व्यापारी याला 5 बकऱ्या व 1 बोकड विक्री केल्याचे सांगितल्याने लागलीच मालेगाव येथील व्यापाऱ्याकडुन गुन्ह्यातील 5 बकऱ्या व 1 बोकड त्याच्या घरा समोर बांधलेल्या मिळुन आल्या संशयित आरोपीला
गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले आहे.
26 हजाराचा किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर
पोलीस स्टेशनचे पथक पोहेकाँ दादाभाई वाघ, पोना नितीन नाईक, संदिप सोनवणे अशांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार दादाभाई वाघ हे करीत आहेत.








