Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार

team by team
September 15, 2022
in राजकीय
0
यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार

मुंबई  l

 

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते देण्याऐवजी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे कुटुंबीय यांच्या हस्ते राज्याची शान असलेल्या या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या सांस्कृतिक खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

 

संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच निमित्ताने येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित राहावे असा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.येत्या 2 ऑक्टोबर रोजी नदी महोत्सवाचाही शुभारंभ होत असून यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय दिवाळीनिमित्त 6 महसूली विभागात दिवाळी पहाट आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

 

पंढरपूर येथे राज्यस्तरीय किर्तनकार प्रवचनकार संमेलन घेण्यात येणार

समाजातील प्रत्येकाचे वेगवेगळया स्वरुपात प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार, प्रवचनकार करत असतात. या सर्वांना एकत्र करुन लवकरच किर्तनकार प्रवचनकारांचे संमेलन पंढरपूर येथे आयोजित करण्यात यावे अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

 

 

श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी विभागामार्फत वेगवेगळया समित्या नियुक्त करण्यात येतात. या सर्व नियुक्त्यांचे एक बुकलेट तयार करणे आवश्यक आहे.तसेच या समित्यांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या अशासकीय सदस्यांची निवड कोणत्या निकषाच्या आधारे करण्यात येते हे निकषही तयार करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या विभागाची दर दोन महिन्यांनी विस्तृत बैठक घेण्यात येईल आणि या बैठकीमध्ये या सगळया बाबींचा आढावा घेण्यात येईल.

 

 

 

पुरस्कार वितरणाचे वेळापत्रक ठरवा

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली अनेक संचालनालय येतात. या संचालनालयामार्फत आणि विभागामार्फत दरवर्षी काही पुरस्कार देण्यात येतात. हे सर्व पुरस्कार वितरणांचे एक वेळापत्रक ठरवून दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळातच ते पुरस्कार त्याच दिवशी वितरीत होतील असे नियोजन करण्यात यावे असेही ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात असलेल्या 52 नाटयगृहांचे अत्याधुनिकीकरण आणि सुशोभीकरणावर भर देण्यात यावा. त्यासंदर्भातील वेळापत्रक तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला यावेळी दिले. ही सर्व नाट्यगृहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मुंबईत मंत्रालय आणि रवींद्र नाट्य मंदिराशी जोडली जातील असेही त्यांनी सांगितले.याशिवाय राज्यात असलेल्या विविध भजनी मंडळाची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र ॲप विभागाने विकसित करावे अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

 

 

 

आज सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय, उपसचिव श्री.विलास थोरात, श्रीमती विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक‍ श्री.बिभीषण चवरे, पुराभिलेख संचालक श्री.सुजीत उगले, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक  संतोष रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

४४ व्या दिवशी मृतदेह मिठाच्या खड्ड्यातून काढून मुंबई कडे शवविच्छेदनसाठी पोलीस बंदोबस्तात रवाना

Next Post

मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण

Next Post
मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण

मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add