Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

४४ व्या दिवशी मृतदेह मिठाच्या खड्ड्यातून काढून मुंबई कडे शवविच्छेदनसाठी पोलीस बंदोबस्तात रवाना

team by team
September 14, 2022
in क्राईम
0
४४ व्या दिवशी मृतदेह मिठाच्या खड्ड्यातून काढून मुंबई कडे शवविच्छेदनसाठी पोलीस बंदोबस्तात रवाना

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील खडक्या येथे मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या न्यायासाठी वडिलांनी ४४ दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता पुर्न शवविच्छेदनासाठी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाला पीडित कुटुंब व गावकऱ्यांनी विरोध दर्शविला असून धडगाव स्थानिक डॉक्टरांनी पहिल्या सर्व विच्छेदनात त्रुटी ठेवल्याने त्यांच्यावर पुन्हा विश्वास कसा ठेवावा? असे सांगत कुटुंबीयांनी मृतदेहावर मुंबई येथील तज्ञांकडून शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती अखेर
४४ व्या दिवशी मृतदेह मिठाच्या खड्ड्यातून काढून मुंबई कडे शवविच्छेदनसाठी पोलीस बंदोबस्तात रुग्ण वाहिका रवाना करण्यात आला.

–
नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील खडक्या येथे मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४४ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला आहे. याबाबत मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे तसेच जोपर्यंत संबंधीत दोषींवर कारवाई होवून मयत मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीसांनी याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने मयत कुटुंबाच्या मयत मुलीच्या कुटुंबियांची समजूत काढीत मृतदेहाचे पुन्हा नंदुरबार येथेच शवविच्छेदन करून योग्य तो अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कडक कारवाई करण्याची आश्वासन दिले होते. मात्र पोलिसांवर विश्वास न ठेवता मुलीच्या कुटुंबियांनी मुंबई येथेच मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले पाहिजे असा हट्ट धरला. आणि अखेर बुधवारी नंदुरबार जिल्हा न्यायालयाने मुलीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन मुंबई येथील जे जे रुग्णालयात करण्याचे लेखी आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

यानंतर बुधवारी सायंकाळी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाचे पथक, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे,  पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा रुग्णवाहिका घेऊन बुधवारी सायंकाळी धडगाव तालुक्यातील खडक्या गावी रवाना झालेत. रात्री मयत मुलीचा मृतदेह उकरून लगेच पोलीस बंदोबस्तमध्ये रुग्णवाहिकाने मुंबईला रवाना झाले आहेत.

तर उद्या गुरुवार दि.१५ रोजी सकाळी मुंबईतील शासकीय जे जे रुग्णालयात मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन, मुलीचा मृत्यू आत्महत्याने झाला की, मुलीवर बलात्कार झाला हे आता मुंबईत शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा
Previous Post

४४ व्या दिवशीही मृतदेह मिठाच्या खड्ड्यात, मुंबई येथील तज्ञांकडून शवविच्छेदन करण्याची मागणी

Next Post

यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार

Next Post
यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार

यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add