नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या न्यायासाठी वडिलांनी ४४ दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता पुर्न शवविच्छेदनासाठी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाला पीडित कुटुंब व गावकऱ्यांनी विरोध दर्शविला असून धडगाव स्थानिक डॉक्टरांनी पहिल्या सर्व विच्छेदनात त्रुटी ठेवल्याने त्यांच्यावर पुन्हा विश्वास कसा ठेवावा? असे सांगत कुटुंबीयांनी मृतदेहावर मुंबई येथील तज्ञांकडून शवविच्छेदन करण्याची मागणी केली.

मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 44 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुण ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होवुनही तिचा खुण झाला असतांना पोलीसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला. इतकच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणी करण्यात आली नसल्याचा आरोप करीत पीडितेच्या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे.
नंदुरबार पोलीसांनी तत्परता दाखवत धडगाव तालुक्यातील खडक्या गावी शवविच्छेदनासाठी दाखल झाले होते. मात्र पीडितेचे वड़ील व गावकऱ्यांनी मात्र त्याठिकाणी शवविच्छेदनास विरोध दर्शवला आहे.धडगावच्या स्थानिक डॉक्टरांनी पहिल्या शवविच्छेदन अहवालात त्रुटी ठेवल्याने त्यांच्यावर पुन्हा विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न उपस्थित करत. पिडीत युवतीच्या मृतदेहावर मुंबई येथील तज्ञांकडुन शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. अजुनही शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी पीडितेच्या कुटुंबीयांची समजुत काढत आहे.
मुलीचा बलात्कार होवुन तिला मारुन त्याला आत्महत्या दाखवल्याचा आरोप करत धडगाव तालुक्यातील खडक्या येथील पीडितेच्या बापाने ४४ दिवसांपासून आपल्या मुलीचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मिठाच्या खड्डयात ठेवला आहे.
याबाबत पुर्न शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतर तालुका दंडाधिकारी यांच्या परवानगी नंतर आज वैद्यकीय पथकासह पोलीस गावात दाखल झाले होते. त्यामुळे याप्रकरणात आणखीन काय घडामोडी घडतील यावर लक्ष लागुन राहीले आहे.








