बोरद l प्रतिनिधी
तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या ७३ वा अवतरण दिवस मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील ९ आश्रमा मध्ये ३ दिवसीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यात दि. ६ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानिमित्ताने देशभरातून नेमून दिलेल्या प्रत्येक आश्रमामध्ये भक्तगणांनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी महाराष्ट्र,गुजरात व मध्यप्रदेशच्या अनुयायांना इंदोर नदीक असलेल्या किठोदा आश्रमात आपली उपस्थिती लावण्यास सांगण्यात आले होते.
यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील संत रामपाल जी महाराज यांचे सर्व अनुयायी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी गेले होते. यावेळी या तीन दिवशीय सोहळ्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातून बरेच भक्तगण आपली सेवा देण्यासाठी ३ दिवस आधीपासूनच त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. तर नंतर ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ ही राज्यातील बऱ्याच भक्तगणांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली. या उपस्थितीमध्ये साधारणतः पाच ते दहा लाख भाविक आल्याचं सांगण्यात आलं यामध्ये दि. ६ सप्टेंबर पासून तर ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर या आश्रमात संत गरीब दास जी महाराज यांच्या अखंड पाठाचे आयोजन ही करण्यात आले. होते यावेळी महाराष्ट्रातूनच त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातून असंख्य भक्तांनी या ठिकाणी भंडाऱ्याचा आस्वाद घेतला.
तत्वदर्शी संत रामपाल महाराजांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा जो भक्त समुदाय आहे तो त्यांच्या आदेशाला शिरोधार्य मानत असतो. त्यामुळे अनेक अनुयायी वरून जसा आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे आपली उपस्थिती त्या त्या ठिकाणी दर्शवीत असतात. त्याच अनुषंगाने आश्रमामध्ये बऱ्याच भक्तगणांनी आपली उपस्थिती दर्शवली. या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय पाहून अनेकांचे डोळे दिपून गेले.
त्याचबरोबर या ठिकाणी असलेली व्यवस्था ही मन भारावून टाकणारी होती. कारण की एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेले असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचे भांडण किंवा गैरसोय याठिकाणी जाणवली नाही या आश्रमाच्या गेटवर उतरल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या भक्तांनकडून येणाऱ्या भगत गणांचे सत साहेब असे म्हणून मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात येत होते. त्याचबरोबर शिस्तीने प्रत्येक जण डाव्या बाजूने आश्रमा पर्यंत पोहोचत होतं तर बाहेर येणारे उजव्या बाजूने आश्रमातून बाहेर पडत होते.
कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांनीही आपली उपस्थिती दर्शवली. आणि तेही ही सर्व व्यवस्था पाहून अचंबित झाले. की आज पर्यंत आम्ही असे भरपूर कार्यक्रम पाहिले पण एवढी सुसूत्रता आम्हाला कुठल्याच कार्यक्रमात दिसली नसल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. आश्रमात प्रवेश केल्याबरोबर आलेल्या भक्तगणांना त्या ठिकाणी जलराम म्हणजेच पाण्याची सुविधा उपलब्ध होती.
त्याच बरोबर प्रत्येकाला चहा बिस्किट देण्यात येत होते.नंतर प्रत्यक्ष दर्शन घेतल्यानंतर भंडाऱ्यासाठी आग्रह करण्यात येत होता. भंडारा घेतल्यानंतर अनेक भक्तगणांनी त्या ठिकाणी आपला मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी या ठिकाणाहून आपल्या गावी परत आले. अशा प्रकारे रामपाल महाराजांचा अवतरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.








