Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयसरच्या संशोधकांची दुर्गम भागात भेट

team by team
September 14, 2022
in Uncategorized
0
आयसरच्या संशोधकांची दुर्गम भागात भेट
नंदुरबार  l  प्रतिनिधी
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यापन आंतरक्रिया शाळा भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पाच शाळाभेटी या कार्यक्रमात करण्यात आल्या. सदर भेटी करतांना डॉ. सौरभ दुबे, प्राध्यापक तथा सहाय्यक प्रकल्प संशोधक आयसर पुणे, श्रीमती श्रद्धा भुरकुंडे, सहयोगी प्राध्यापक, डायट नंदुरबारचे वरिष्ठ अधिव्याख्याता  रमेश चौधरी, अधिव्याख्याता तथा समन्वयक डॉ राजेंद्र महाजन, अधिव्याख्याता  सुभाष वसावे, आयसर चे प्रकल्प व्यवस्थापक  नितीन तिवाने , आयसरच्या सहयोगी शिक्षक श्रीमती प्रज्ञा पुजारी,  शुभम पाटील यांच्या पथकाने शाळांना भेटी दिल्या. यात अक्कलकुवा तालुक्यातील  पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रम शाळा मोलगी, माध्यमिक विद्यालय  मोलगी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिजरीपाटी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकलीउमर, शासकीय आश्रम शाळा डाब अशा पाच शाळांना भेटी देण्यात आल्या.
यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपारिक वेशभूषा करून मान्यवरांचे स्वागत केले. माध्यमिक विद्यालय  मोलगी येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीक वाद्यांसह पारंपारिक शिबली नृत्य सादर केले.  यावेळी प्राध्यापक तथा संशोधक डॉ. सौरभ दुबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, आपल्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या विविध घटनांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती श्रीमती श्रद्धा भुरकुंडे व प्रज्ञा पुजारी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोग टाकाऊ वस्तुपासून कसा तयार करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.  दहावीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयातील विविध संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांना बोलते केले. विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानातील नव्या संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.
या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पुणे येथील आयसर संस्थेच्या सर्व संशोधक अधिकाऱ्यांनी मुक्तपणे संवाद साधला.  विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी व विज्ञानाचा योग्य तो प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने या शाळाभेटींचे नियोजन करण्यात आले होते. या भेटीत ड्रोन कॅमेराद्वारे विद्यार्थी प्रात्यक्षिकांचे अनुभव संकलन करण्यात आले. यावेळी मोलगी केंद्राचे केंद्रप्रमुख के. डी. सूर्यवंशी व डाब केंद्राचे केंद्रप्रमुख बी. पी. पवार उपस्थित होते . कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपा पक्षात समाविष्ठ करा : आ.चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

संत रामपाल जी महाराज यांच्या ७२ वा अवतरण दिवस उत्साहात साजरा

Next Post
संत रामपाल जी महाराज यांच्या ७२ वा अवतरण दिवस उत्साहात साजरा

संत रामपाल जी महाराज यांच्या ७२ वा अवतरण दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add