नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उध्दव ठाकरे गट यांच्या २५ कार्यकर्त्यांना पक्षात समाविष्ठ करून नविन २५ मतदार जोडावे. भाजपातर्फे बुथ सक्षमीकरण करण्यात येत आहे. बुथ सक्षमीकरण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे सक्षमीकरण असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदुरबार येथे झालेल्या भाजपा मेळाव्याप्रसंगी केले.

नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात भाजपा पदाधिकारी व शक्ती केंद्र बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान मेळाव्याच्या आदी धुळे चौफुली येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो दुचाकीस्वारांनी यात सहभाग नोंदवला. मोटरसायकल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिर परिसरात करण्यात आला. मेळाव्याचा सुरूवातीला प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बैठकीला आदिवासी विकासमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटनमंत्री रवि अनासपुरे, भाजपयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी आ.शिरीष चौधरी, प्रदेश सचिव मनोज पांगारकर, आदिवासी मोर्चा प्रदेउपाध्यक्ष नागेश पाडवी, डॉ.शशिकांत वाणी, राजेंद्रकुमार गावीत, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, मकरंद पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना आ.बावनकुळे म्हणाले की, नंदुरबार येथे निघालेली मोटरसायकल रॅली राज्यातील सर्वोत्तम रॅली होती. आदिवासी समाजाचे भले करण्यासाठीच आदिवासी विकासमंत्रीपदी डॉ.विजयकुमार गावीतांची समावेश करण्यात आला. भाजपा पक्ष हा एक कुटूंब असून भावना संवेदना या गोष्टींचा समावेश आहे. ते भाजपाचा संस्कारात आहे. इतर पक्षामध्ये ते पाहायला मिळत नाही. जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपामध्ये आपण आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा, आगामी काळात शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात २०० प्लस आमदार निवडून आणू व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उध्दव ठाकरे गट यांचा पराभव करू, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार, खासदार जास्त असल्याने उध्दव ठाकरे यांचा फक्त गट शिल्लक असल्याचा चिमटा त्यांनी यावेळी घेतला. यावेळी ते पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिंदेगट एकत्र लढणार असून चारही पालिकेवर भाजपा शिंदेगट विजयी होईल. सत्ता हे साध्य नसून शेवटच्या व्यक्तीचे भले करण्यासाठी नागरीक सत्ता देत असतात. २१ च्या शेतकात भारताला विश्वगुरू करायचे असेल तर नरेंद्र मोदींना २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान करायच आहे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपातर्फे बुथ सक्षमीकरण करण्यात येते, बुथ सक्षमीकरण करण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे सक्षमीकरण, शासनाचा योजना सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्ह्यात महिलांचे संगठन मजबूत व्हायला पाहिजे. सुशिक्षीत महिला नेत्या तयार करण्याचा त्यांनी यावेळी सूचना दिल्या. त्या सोबत २०२४ पर्यंत २५ लाख युवा मोर्चातर्फे तयार करण्यात येणार आहे. मागील अडीच वर्षात केंद्रातर्फे आलेल्या पंतप्रधानांचा योजना थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे विकास थंाबला होता. मात्र आता आपले सरकार आल्याने या योजनांना गती मिळेल. आपले सरकार असल्याने अधिकारी अथवा कोणी वाईट वागला तर त्याला सोडणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जिल्हयातील प्रत्येक पदाधिकार्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उध्दव ठाकरे गटातील २५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपात जानेवारी २०२३ पक्ष प्रवेश देवून २५ नविन मतदार तयार करून भाजपाला एकनंबरचा पक्ष बनवण्याची आहे असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा वार्षिक अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.








