नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खर्दे खुर्दे येथे आज दि. १३ सप्टेंबर रोजी वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील पुर्व भागात अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. राज्यात सर्वत्र पाऊस पडत असतांना नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्टा यापासून वंचित होता. आज दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील पुर्व भागात पावसाने हजेरी लावली.
दरम्यान तालुक्यातील खर्दे खुर्दे येथे दुपारी १.१० मिनीटांनी वादळी वार्यासह वीजाचा गडगडाटसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान खर्दे खुर्दे येथील शेतकरी भावराव नामदेव पाटील यांच्या बैलावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.गेल्या तीन ते चार वर्षापासून पुर्वपट्यातील शेतकरी होरपळून निघाला असतांना ऐन हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








