नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात दुकान फोडून चोरट्यांनी बुट, रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरा असा सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील बागवान गल्लीतील मोहंमद मुसा अब्दुल गफ्फार खत्री यांचे खत्री कलेक्शन दुकान आहे. सदर दुकानाच्या जाळीच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीचे कपडे, बुट व एक लाखाची रोकड तसेच ५ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत मोहंमद मुसा अब्दुल गफ्फार खत्री यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामा वळवी करीत आहेत.








