Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यातील मनवाणीत येथील बैलपोळा रद्द, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय

team by team
August 25, 2021
in सामाजिक
0
सातपुड्यातील मनवाणीत येथील बैलपोळा रद्द, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय
मोलगी l प्रतिनिधी:
सर्जा राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातपुड्यातील मनवाणी ता. धडगाव येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
बैलपोळा सर्वत्र मोठ्या थाटात साजरा होत असला तरी सातपुड्यात मात्र हा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मनवला जातो. पोळ्यानिमित्त खरीप हंगामातील शेतीकामांनी ग्रासलेले तथा उत्सवप्रिय आदिवासी बांधव थकवा घालवतात. प्रत्येक शेतकऱ्यांकडून सकाळीच बैलांची पुजा केली जाते. त्यानंतर  संपुर्ण सकाळीच केवळ  मनवाणी ता. धडगाव येथेच साजरा होणाऱ्या बैलपोळा उत्सवाला गुजरात व मध्य प्रदेशातूनही आदिवासी बांधव हजेरी लावतात. पोळ्यानिमित्त मनवाणीत बाजार भरत असून ढोल ताशे व पारंपरिक नृत्यही सादर केले जाते. त्यामुळे सातपुड्यातील बांधवांना यंदाच्या पोळ्याची उत्सुकता लागली होती. परंतु कोरोना महामारीमुळे अवघा सातपुडा संवेदनशील बनला आहे. करोनाचे संकट लक्षात घेता यंदाच्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर मनवाणी येथील ग्रामस्थ व धडगाव तालुका पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंदाचा बैलपोळा साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचा ठराव घेण्यात आला. शिवाय परंपरेनुसार ढोल ताशा व नृत्य सादर केले जाणार नाही. त्यामुळे सातपुड्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील बांधवांनी मनमानी येथे पोळ्यानिमित्त उपस्थित राहू नये, असे आवाहन या बैठकीद्वारे धडगाव तालुका पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी केले आहे. धडगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस कांस्टेबल पुष्पेंद्र कोळी, मनवाणीचे सरपंच गुलाब सिंग राहसे, पोलीस पाटील रामा वळवी, नायलीबाई वळवी, काकड्या पुंजारा, लोब्या राहसे, भिगजा रामसे, रायसिंग राहसे, गिरीश वळवी, रायसिंग वळवी, सुमित तडवी, चमाऱ्या राहसे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अंजने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे : माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांची मागणी

Next Post

नंदुरबार येथे गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार येथे गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add