नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील देसाईपुरा कुंभारगल्ली येथे मागील किरकोळ वादातून चाकूने पोटावर वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील अमृत चौक येथील निखील सुरेश चौधरी हे देसाईपुरा कुंभारगल्ली परिसरात त्यांच्या जुन्या घरासमोर उभे होते.
यावेळी मागील किरकोळ वादातून मयूर दिलीप चौधरी याने निखील चौधरी यांच्याशी हुज्जत घालून त्यांना पकडून ठेवले. अभिजीत राजेंद्र चौधरी व मोनु जितेंद्र चौधरी यांनी लोखंडी रॉडने निखील चौधरी यांच्या पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. आनंद जितेंद्र चौधरी, जितेंद्र बाबुलाल चौधरी, दर्शन राजेंद्र चौधरी यांनीही काठीने मारहाण केली. तसेच सागर मोहन चौधरी याने चाकूने निखील चौधरी याच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न करीत असता चाकूचा वार चूकवित असतांना निखील चौधरी यांच्या दोन्ही हाताला व पोटावर वार लागल्याने दुखापत झाली.
याबाबत निखील चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माळी करीत आहेत.








