नंदुरबार l
शहरातील तुलसी हॉस्पिटलच्या मेडीकलजवळून चोरट्याने दुचाकी लंपास केली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील स्वप्निल घनश्याम वाघारे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ आर ९००४) तुलसी हॉस्पिटलच्या मेडीकलजवळून चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत स्वप्निल वाघारे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.निलेश पाटील करीत आहेत.








