नंदुरबार : नवापूर शहरातील देवळफळी येथे तक्रार दिल्याच्या रागातून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील देवळफळी येथील सनि सर्वेस कुशवाह याने राकेश गावित याच्याविरोधात पाच ते सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली. या कारणावरुन सनि कुशवाह यान राकेश गावित याने कड्याने डाक्यावर मारहाण करुन दुखापत केली.
यावेळी सनि कुशवाह यांचा मित्र हेमंत मोरे हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही कड्याने डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत सनि कुशवाह यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात राकेा गावित याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी करीत आहेत.








