नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बालवीर चौक ,नवा भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आज गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला एक शाम शहीदो के नाम देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
प्रतिवर्षी गणेशोत्सवानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली आहे. आज गुरुवार सायंकाळी सात वाजता देशभक्तीपर गीतांना प्रारंभ होईल.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणरायांची आरती करण्यात येईल.तसेच भारत माता व हुतात्मा शिरीषकुमार प्रतिमा पूजन होईल.
उद्या दि. 9 सप्टेंबर रोजी शहीद दिन असून पूर्वसंधेला नंदनगरीच्या बालवीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एक शाम शहीदो के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे व सर्व सभासदांनी केले आहे.









