नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव शहरातील बस स्थानकाजवळ बील जास्त लावल्याच्या कारणावरुन डॉक्टरास कानशिलात लगावली तसेच दवाखान्यातील साहित्य अस्तावस्त फेकल्याने एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील कुकतार येथील डॉ.संजय रावल्या वळवी यांनी पेशंटच्या उपचाराचे बील जास्त लावल्याचा गैरसमज करुन नटवर आपसिंग पावरा रा.मांडवी ता.धडगाव याने धडगाव बसस्थानकाजवळील याहा दवाखान्यात डॉ.संजय वळवी यांच्या कानशिलात लगावली.
तसेच दवाखान्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून शिवीगाळ केली. याबाबत डॉ.संजय वळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात नटवर पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेव संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.








