नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील जामली गावाच्या फाट्यावर भांडणाच्या कुरापतीतून एकास लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील आमलापाडा येथील अमृत विनोद वळवी यांना जामली गावाच्या फाट्याजवळील एका हॉटेलवर भांडणाच्या कुरापतीतून विशाल लक्ष्मण पाडवी, लक्ष्मण पाडवी, अशोक रमेश तडवी, चंदाबाई लक्ष्मण पाडवी व राहूल लक्ष्मण पाडवी सर्व रा.वाण्याविहिर ता.अक्कलकुवा यांनी लाठ्याकाठ्यांनी डोक्यावर व खांद्यावर मारहाण करुन दुखापत केली.
याबाबत अमृत वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राणीलाल भोये करीत आहेत.








