नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौक, नवा भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही पर्यावरणपूरक शाळू मातीचे गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरम्यान रविवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्रींचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे यंदा मंडळाचे 35 वे वर्ष असून विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात मंडळाने परंपरा कायम राखली आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव समिती अध्यक्ष गोपाल हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे, अशोक यादबोले, विशाल हिरणवाळे, आमेष कासार, डॉ.गणेश ढोले, कैलास ढोले, आदि सदस्य परिश्रम घेत आहेत. शाळू माती निर्मित तब्बल दोन क्विंटल वजनाची श्री गणरायाची मूर्ती यंदाही दर्शन आर्टचे मूर्तिकार दर्शन सोनार व कुणाल सोनार या बंधूंनी साकारली आहे.








