Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार

team by team
September 3, 2022
in राज्य
0
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार

धुळे   l 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपर मदतनिधी लवकरच जमा करण्यात येईल. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कासारे, ता. साक्री येथे मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते आज सकाळी बसस्थानक चौक सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, कासारेचे सरपंच विशाल देसले, उपसरपंच फातिमा पठाण, सुवर्णा देसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी, डॉ.तुळशीराम गावीत, सतीश महाले आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. या सरकारने सुरवातीलाच पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले.

त्याचा सर्वांनाच लाभ होत आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आहे याचा फायदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

कासारे ग्रामपंचायतीने केलेली विकास कामे अनुकरणीय आहेत. ग्रामपंचायतीतर्फे साकारण्यात येणारे महापुरुषांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल. साक्रीसह कासारे परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. गणेशपूर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर असून पावसाळ्यानंतर त्याचे काम सुरू होईल असेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी विविध गावाचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते परिसरातील गावांच्या सरपंचाचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी दाखल अर्जापैकी छाननीत सदस्यपदाचे चार अर्जबाद, ६ सप्टेंबर रोजी माघारी

Next Post

शहीद शिरीषकुमार मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज

Next Post
शहीद शिरीषकुमार मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज

शहीद शिरीषकुमार मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add