Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी दाखल अर्जापैकी छाननीत सदस्यपदाचे चार अर्जबाद, ६ सप्टेंबर रोजी माघारी

team by team
September 3, 2022
in Uncategorized
0
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी दाखल अर्जापैकी छाननीत सदस्यपदाचे चार अर्जबाद, ६ सप्टेंबर रोजी माघारी

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून काल दि.२ सप्टेंबर रोजी छाननीत सदस्य पदासाठी ४, नामांकन अर्ज  बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता ७५ ग्रामपंचायतीचा ६१५ सदस्य पदासाठी १ हजार ४४३ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१२ उमेदवार रिंगणात आहे. दि.६ सप्टेंबर रोजी माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नंदुरबार तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातच शासनाने कोरोनाचे विविध निर्बंध लावण्यात आल्याने निवडणुका लांबविल्या होत्या. दरम्यान ऑगस्टमध्ये निवडणुक आयोगाने नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला.

त्यामुळे दि.२४ ऑगस्टपासून ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याची सुरूवात झाली होती. नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या ६१५ पदासाठी १ हजार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१२  नामांकन अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झाले होते. दरम्यान काल दि.२ रोजी नामनिर्देशन पत्र नंदुरबार येथील वखार महामंडळ येथे छाननी करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत माहिती प्राप्त होवू शकली नाही. यात नंदुरबार तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचपदासाठी  १२ नामनिर्देशन पत्रापैकी सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. तर सदस्यपदासाठी तर ६१५ सदस्य पदासाठी १ हजार ४४७ अर्जांपैकी ४ नामनिनर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सदस्यपदासाठी १ हजार ४४३ नांमनिर्देशनत्र दाखल आहे.

अवैध ठरविण्यात आलेल्या अर्जांमध्ये तालुक्यातील आष्टे, नंदपुर, फुलसरे, नांदर्खे या गावातील सदस्यांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील नंदपुर येथील पुरूषोत्तम हिम्मतराव धनगर यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने अर्जबाद करण्यात आला तर तालुक्यातील आष्टे येथील सोनल हिरामण भिल यांचे २१ वर्ष पूर्ण नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.

तर नंदुरबार तालुक्यातील फुलसरे येथील एकाने वॉर्ड नंबर १ मध्ये महिल राखीव जागा असतांना अर्ज दाखल केल्याने त्याचाही अर्ज नामंजूर करण्यात आला. दरम्यान छाननी प्रसंगी ८ नामांकनावर हरकती घेण्यात आल्या. यात नवागांव १, पातोंडा २, नागसर १, गुजरभवाली १, होळतर्फे हवेली ३ येथील अर्जांवर हरकत घेण्यात आल्याने यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. दि.६ सप्टेंबर रोजी माघारीची अंतीम तारीख आहे. त्यानंतरच ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनात डॉ.काणे हायस्कूल व डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी मारली बाजी

Next Post

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार

Next Post
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add