नंदुरबार l प्रतिनिधी
येथील हि.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे आयोजित ४२ वे. तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलची दिव्या पाटील या विदयार्थिनीचे इलेक्ट्रीक पोल सुरक्षा प्रणाली या उपकरणास प्रथम व प्राथमिक गटात डी.आर.हायस्कूलच्या मयुर गवते या विदयार्थ्याचे गणितीय प्रयोगशाळा या उपकरणास प्रथम पारितोषिक मिळाले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिषचौधरी,गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह फयाझखान,मनोहर साळुंखे,पर्यवेक्षक जगदीश पाटील,विदया सिसोदिया ,प्रा.चंद्रकांत सोनवणे अदी उपस्थित होते.
मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात प्रथम डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलच्या दिव्या सुरेश पाटील हिच्या इलेक्ट्रीक पोल सुरक्षा प्रणालीस प्रथम,हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या संचिता नरोत्तम पाटील हिच्या मॉर्डन सिस्टीम ऑफ व्हेईकल या उपकरणांस व्दितीय, पी.के.पाटील माध्यमिक विदयालयाच्या सिध्दी सुभाष कोकणी हिच्या स्मार्ट डस्टबिन या उपकरणांस तृतीय तर आदिवासी राखीव गटात जळखे अनुदानित प्रा.मा.विदयालयाच्या आयुष सालमसिंग वसावे याच्या गॅस लिकेज माहिती देणारे यंत्रास प्रथम,तर प्राथमिक गटात डी.आर.हायस्कूलच्या मयुर योगेशकुमार गवते यांच्या गणितीय प्रयोगशाळा या उपकरणांस प्रथम,
श्रॉफ हायस्कूलच्या मृदुला प्रशांत कासार हिच्या सौर घडयाळ या उपकरणांय व्दितीय ,एकलव्य विदयालयाच्या मनस्वी रामानंद चव्हाण हिच्या आधुनिक चष्मा या उपकरणांस तृतीय,तर आदिवासी राखीव गटात श्रीमती पुतळाबाई पाटील माध्यमिक विदयालयाच्या जयेश सुरेश भिल याच्या एसी.व्हेजिटेबल स्टॉल या उपकरणांस प्रथम तर प्राथमिक शिक्षक गटात आदर्श विदयामंदिरच्या निलेश नंदकिशोर बागुल यांच्या जर्नी ऑफ युनिव्हर्स,माध्यमिक शिक्षक गटात श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयाच्या दिनेश बबन देवरे यांचे संगित वादयांचा आवाज,लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात सिध्देश्वर माध्यमिक विदयालयाच्या रश्मी परशराम डंडीर यांच्या लोक हात धुणे,
तर माध्यमिक गटात श्रॉफ हायस्कूलच्या देविदास भिका पाटील यांच्या लोकशिक्षण कारणे व परिणाम ,प्रयोगशाळा परिचय गटात श्रॉफ हायस्कूलच्या अनिल चंद्रकांत मंडलिक यांच्या कमी जागेत उपकरणांची मांडणी या उपकरणांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
परिक्षक म्हणून प्रमोद भावसार,रेखा कुंवर,किरण सोनार,जितेंद्र पाटील,पराग राणे यांनी काम पाहिले. मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले.सूत्रसंचालन चेतना पाटील व आभार कपूरचंद मराठे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रॉफ हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.








