नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गणेश उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबवून नंदुरबार पोलीस दल हा उत्सव कायदा सुव्यवस्थेत व शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
याच अनुषंगाने नवापूर शहरातील गणेश मंडळ ठिकाणी नंदुरबार पोलीस दलातील बॉम्बशोधक पथक यांच्यामार्फत संपूर्ण मंडळ परिसराची तपासणी करण्यात आली. बॉम्बशोधक यंत्राद्वारे मंडळाच्या चप्या चप्प्याची पाहणी पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुजित डागरे,
पोलीस हेडकॉन्स्टेबल निळकंठ भामरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर, पोलीस हेडकॉन्स्टेबल डॅनियल राऊत ,राकेश गावित विनोद पराडके यांचा समावेश होता या बॉम्बशोधक पथकाद्वारे नवापूर शहरातील गणेश विसर्जन मार्गाची देखील पाहणी करत बॉम्बशोधक यंत्राद्वारे नवापूर शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक परिसर गर्दी असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात आली.








