नवापूर l प्रतिनिधी
आदिवासी ज्ञानपीठ संस्था नवापूर संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा दापुर येथे ४३ वे नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सोहळ्याचे नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन नवापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी ज्ञानपीठ नवापूर संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला महादू गावित तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विजय गावित, संचालक कुलदिपक गावित, ग्रामपंचायत दापूर माजी सरपंच रश्मी गावित, सेवानिवृत्त अभियंता संरक्षण विभाग जयराम कुवर, नवापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ, सचिव एस व्ही भामरे, सेवानिवृत्त प्राचार्य गोपाल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आर सी पवार,केंद्र प्रमुख किशोर रायते, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष विनय गावित,
कोषाध्यक्ष संजयकुमार जाधव, विद्यासचिव अंबालाल पाटील, सहविद्यासचिव दिनेश बिरारिस, सहसचिव धर्मेंद्र वाघ, आश्रम शाळा मुख्याध्यापक सुदाम वसावे, महेंद्र वळवी, सुजित गावित, चंद्रकांत गावित, दापूर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नरसिंह वाघ, शरद खैरनार, मुख्याध्यापक सुमन गावित, मनोज सगर आदी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या २१ शाळा व माध्यमिक विभागाच्या ४४ शाळा, प्राथमिक आदिवासी राखीव गटात ७, माध्यमिक आदिवासी राखीव गटात १५, प्राथमिक शिक्षक निर्मिती निर्मित अध्यापन साहित्य ४, माध्यमिक शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य २ तर प्रयोगशाळा परिचर गटात २ असे एकूण तालुक्यातील ३० ते ३२ प्राथमिक, माध्यमिक शाळा,आश्रम शाळांनी सहभाग नोंदविला तर विशेष या वर्षी पहिल्यांदाच शासकीय आश्रमशाळेचा सहभाग दिसून आले.
विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिल भामरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल इंदवे यांनी केले. तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तसेच विज्ञान शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.