नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील तिलाली शिवारातील शेतातून चोरट्याने सौर प्लेटांसह स्टार्टर असे ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील गांधी नगर येथील साहेबराव पुंडलिक चित्ते यांचे तिलाली शिवारात शेत आहे. सदर शेतातून चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीच्या ९ सौर प्लेटा व १५ हजार रुपये किंमतीचे सोलर स्टार्टर असे एकूण ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले. याबाबत साहेबराव चित्ते यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेहेकॉ.साहेबराव सामुद्रे करीत आहेत.








