नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील माळीवाडा व तालुक्यातील आसाणे तसेच शहादा तालुक्यातील कलमाडी व नवापूर तालुक्यातील भरडू अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी चार दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील विवेक राजेंद्र माळी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ क्यू ८९४४) घरासमोरील अंगणातून चोरट्याने लंपास केली. याबाबत विवेक माळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोना.संजय मालपुरे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील हेमंत रतिलाल महाले यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएच ५८६७) त्यांच्या राहत्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबात्बा हेमंत महाले यांच्या फिर्यादीरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोना.सरवरसिंग वसावे करीत आहेत. तिसऱ्या घटनेत शहादा तालुक्यातील कलमाडी येथील हमाभाई वस्ताभाई भरवाड यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एस ०८०५) शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील एका रुग्णालयाजवळून चोरट्याने लंपास केली. याबाबत हमाभाई भरवाड यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत.
तर नवापूर तालुक्यातील भरडू येथील गुलाबसिंग सखाराम गावित यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएफ ५६९०) त्यांच्या राहत्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत गुलाबसिंग गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण कोकणी करीत आहेत.








