नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील नंदुरबार धुळे जिल्हा सीमेवरील खोकसापासून तर मोर करंजा दरम्यान जवळपास 40 ते 50 गावे डोंगरा लगत असल्याने नेहमी वन्य प्राण्यांपासून धोक्याची घंटा असते. जामनपाडा गाव ही अगदी डोंगरालगत असून गावाच्या स्मशानभूमी लगत असलेल्या डोंगराजवळ. गावातील व्यक्तींना पटेदार वन्य प्राण्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे. तसेच सदर प्राणी वाघ की बिबट्या असा संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अंगावर पट्टे असल्याचे माहिती दिली आहे. सदर प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी झाडावर चढून सदर प्राण्याचा व्हिडिओ देखील चित्रित केला आहे.
याबाबत वनविभागाचे अधिकारी व तज्ञांकडून माहिती घेतली असता. सदर व्हिडिओत दिसणारा प्राणी वाघ नसून बिबट्या असल्याची खात्रीलायक माहिती दिली आहे. हि नक्कीच चांगल्या समृध्द जंगलाची निशाणी आहे. तो त्याचाच अधिवासात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व नागरिकांनी जंगल व वन्य प्राणी यांचे जतन करावे. असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर प्राण्यांपासून धोका निर्माण झाल्यास तत्काळ वन विभागाला संपर्क करावे.








