नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील जयहिंद कॉलनी व शहाद शहरातील कृषी भवन अशा दोन्ही ठिकाणाहून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील संजय दादला पावरा यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एई ९५६५) जयहिंद कॉलनीतील त्यांच्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत संजय पावरा यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र दाभाडे करीत आहेत.
तर शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील विदेश भास्कर वळवी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ आर २१५३) शहादा शहरातील कृषी भवनाच्या भिंतीसमोरील गेटजवळून चोरट्याने लंपास केली. याबाबत विदेश वळवी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत.








