Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके घोषणा देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केले आंदोलन

team by team
September 1, 2022
in राजकीय
0
महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके घोषणा देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केले आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसतर्फे देशात वाढत असलेल्या महागाई विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याची परिस्थिती एकंदर खालोखाल जात आहे आणि अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टी आमदार खरेदी-विक्रीसाठी प्रचंड पैसा खर्च करीत आहे, एकेक आमदार विकत घेण्यासाठी अंदाजे ५०-५० कोटी रुपये आमदारांना दिले आहेत व त्यांच्या सुख सोयींसाठी त्यांना गुवाहाटीमध्ये त्यांच्यावर प्रचंड पैसा खर्च केला. यामुळे महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके, ५० खोके, जनता भरते जीएसटी गद्दार जातात गुवाहाटी ५० खोके महागाई ओके, महागाई कशासाठी-आमदारांच्या खरेदीसाठी अशा घोषणा देत महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ दिलीपराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसतर्फे महागाई विरुद्ध आंदोलन करण्यात आले. राज्यात पावसामुळे जे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे तेथे लक्ष न देता नेत्यांनी फक्त स्वतःची कॅबिनेट कशी बनवायची, स्वतःचा पक्ष कसा वाचवायचा, ही सत्ता कशी वाचवायची याबद्दलच संपूर्ण शक्ती पणाला लावली आणि एकीकडे राज्यातील जनतेला मोकळे रस्त्यावर सोडून दिले.

या विरोधात आज राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. लवकरात लवकर पावसामुळे झालेले नुकसान आणि वाढती महागाई यावर उचित व योग्य ते निर्णय नाही घेतले तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, राष्ट्रवादी नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, ओबीसी सेलचे जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, शहर कोषाध्यक्ष सुनिल राजपूत, अदनान मेमन, अनमोल पाडवी, राहुल जगदेव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकी अडवून सिनेस्टाईल लांबविली 95 हजाराची रोकड

Next Post

नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती

Next Post
नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती

नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add