Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त आज महत्त्वपूर्ण बैठक

team by team
August 30, 2022
in राजकीय
0
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त आज महत्त्वपूर्ण बैठक
नंदुरबार  l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची तसेच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.
अधिक माहिती देताना विजय चौधरी यांनी सांगितले की,  राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे पूर्व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. , त्यामुळे त्यांच्या जागी ओबीसींचा चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले.
 त्यानंतर नंदनगरीत त्यांचे प्रथमच आगमन होत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि.13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत.  त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले असून त्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि महत्त्वपूर्ण चर्चा होईल.
 त्याचबरोबर सामाजिक संवाद, बुथ कार्यकर्त्यांशी संवाद, युवा शाखेचे उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश राहील. त्याप्रसंगी भव्य बाईक रॅली काढून नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येईल, असेही याप्रसंगी विजय चौधरी यांनी नमूद केले.
 या दौऱ्याविषयी तसेच त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी चार वाजता विजयपर्व येथे आयोजित करण्यात आली आहे . राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित, आ. राजेश पाडवी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करतील, तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील विजय  चौधरी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ अर्ज दाखल

Next Post

आयशरची कारला धडक, पिता- पुत्र जखमी,आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
आयशरची कारला धडक, पिता- पुत्र जखमी,आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

आयशरची कारला धडक, पिता- पुत्र जखमी,आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add