धुळे l प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू राजस्थान येथील संस्थेतर्फे चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया संमेलनास आजपासून प्रारंभ होत आहे.
दि.30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आयोजित या संमेलनात महाराष्ट्रातील सुमारे दोनशेहून अधिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.अशी माहिती मीडिया विभागाचे महाराष्ट्र समन्वयक डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी दिली.
निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या शांतीवन येथील नयनरम्य परिसरात राष्ट्रीय मीडिया संमेलन होत आहे.
या संमेलनात गुरुग्राम येथील आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या बीके शिवानी दीदी प्रबोधन करणार आहेत.देशभरातून दीड हजाराहून अधिक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकार, संपादक, प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले आहेत. सकारात्मक पत्रकारिता समृद्ध भारताकडे प्रवास या विषयावर चार दिवस मंथन होणार आहे.ब्रह्मकुमारी संस्थांच्या मीडिया विभागाद्वारे शांतीवन येथे आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता शुभारंभ होईल.
राजस्थान विधानसभेचे मुख्य सभापती आणि प्रभारी मंत्री महेंद्र चौधरी यांच्या हस्ते मीडिया संमेलनाचे उद्घाटन होईल.याशिवाय पत्रकारांना सकारात्मक मंत्र देण्यासाठी गुरुग्रामच्या आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या बीके शिवानीदीदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याबाबत मीडिया विंगचे राष्ट्रीय समन्वयक बीके शांतनू यांनी सांगितले की, मीडिया विंगची स्थापना 1985 मध्ये झाली.वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी आयोजित राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा समारोप दि. 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी मीडिया विभागाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.समाजात सकारात्मक वृत्त प्रसारित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे हा या मीडिया संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी झाले आहेत.








