नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील पटेलवाडी व महाराणा प्रताप पुतळ्याजवळ चोरीची दुचाकी बाळगतांना आढळून आल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात भरतराम जोशीराम चौधरी हा चोरीची दुचाकी (क्र.एकम.एच.१२ जेआर ४११६) संशयास्पदरित्या ताब्यात बाळगतांना आढळून आला.
तसेच नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळील रस्त्यावर राजू वाला भरवाड हा चोरीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएच ७४४८) संशयास्पदरित्या ताब्यात बाळगतांना आढळून आला. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पोशि.इम्रान खाटीक व पोशि.अभय राजपूत यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १२४ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोहेकॉ.संदिप गोसावी व अतुल बिऱ्हाडे करीत आहेत.








