नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील रेल्वे स्थानक व नवापूर शहरातील इस्लामपूरा येथून अशा दोन ठिकाणीहून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील उपेंद्र रामजी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ वाया २७२९) नंदुरबार शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून चोरट्याने लंपास केली. याबाबत उपेंद्र रामजी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोना.अरविंद पाडवी करीत आहेत. तर नवापूर येथील सोहेब मसूद काझी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१८ टी २८३९) नवापूर शहरातील इस्लामपूरा भागातून चोरट्याने लंपास केली. याबाबत सोहेब मसूद काझी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराजसिंग परदेशी करीत आहेत.








