शहादा l प्रतिनिधी
‘भगवान श्री चक्रधर स्वामी की जय’…. असा नामघोष करीत श्रीकृष्ण मूर्तीची आज गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संत महंतांसह हजारो भाविकांच्या गर्दीने निघालेली शोभायात्रा आणि श्री चक्रधर स्वामींच्या जयघोषाने मोहिदा नगरी दुमदुमून गेली. दरम्यान, आज (ता. २९) सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी अवतार दीन महोत्सवानिमित्त मोहिद्यात भक्तांच्या मेळावा भरणार आहे.
मामाचे मोहिदा (ता. शहादा)येथील अयोध्या नगर मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ४८ वा अवतार दिन महोत्सवाचा कार्यक्रम होत आहे. त्याच्या पूर्व संध्येला मोहिदा गावातून श्रीकृष्ण चरणांकित मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली गावातील रास खांब चौकात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरापासून पूजा करून शोभायात्रेस सुरुवात झाली. यावेळी श्रीकृष्ण भजनी मंडळ, अत्रेय भजनी मंडळ,रास मंडळ, मोहिदा ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सदभक्त दीमतीला होते. यावेळी शोभायात्रेत नागरिकांनी दंडवत प्रणाम लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या.
महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या व फेटे परिधान करून गरबा नृत्य सादर केले सोबतच श्री चक्रधर स्वामींच्या नावाच्या जयघोष केला शोभायात्रेच्या स्वागतासाठी घरोघरी रांगोळ्या व गुढ्या उभारलेल्या होत्या संत महंतान सह हजारो भाविकांच्या गर्दीने निघालेली शोभायात्रा आणि श्री चक्रधर स्वामींच्या जयघोषाने मोहिदा गाव दुमदुमून गेले पूर्ण गावभर पालखीचे पूजन करण्यात आले तर नंतर आयोध्या नगर येथील कार्यक्रम स्थळी शोभायात्रा पोहोचली या ठिकाणी विधिवत पूजाअर्चा करून शोभायात्रेच्या समारोप करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील संत महंत भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव
जय श्री कृष्ण महानुभाव परिषद शहादा तसेच श्री चक्रधर प्रभू अवतार दिन महोत्सव समिती व ग्रामस्थ मामाची मोहिदे पंचक्रोशीतील सदभक्त मित्र यांच्या सहयोगातून ४८ वा श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव मोहिदा येथील अयोध्या नगर मध्ये उद्या (ता.२९) जाधववाडी (जि. पुणे) येथील देवदत्त आश्रमाचे संचालक आचार्य प्रवर प. पू. नरेंद्र मुनी अंकुळेकर उर्फ मोठेबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून उपस्थितीची आवाहन मोहिदा ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.








