नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील राणीपूर व नवापूर शहरातून अशा दोन्ही ठिकाणाहून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्या.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील राणीपूर येथील बळीराम कालूसिंग पराडके यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ क्यू ०५२४) राणीपूर ते अंबापूर शिवारातील शेताजवळून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत बळीराम पराडके यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण करीत आहेत.
तर नवापूर येथील आशिष प्रभू गावित यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एके ८१०५) नवापूर शहरातील एका दुकानाजवळून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत आशिष गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाऊ वाघ करीत आहेत.








