नंदुरबार | प्रतिनिधी
शहरातील साक्रीनाका परिसरात पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या संशयातून एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात शाहरुख अली अहमद खान यांनी पोलिस ठाण्यात खोटी माहिती दिल्याचा संशय घेत शान रामसिंग गावित याने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारुन दुखापत केली.
तसेच दिनेश कंपू कोकणी याने काठीने मारहाण केली व राहूल उत्तम भील याने पोलिसात तक्रार केली तर जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत शाहरुख अली अहमद खान यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.








