नवापूर l प्रतिनिधी
नवापुर पोलीसांची घवघवीत कामगिरी करीत अवघ्या २४ तासातच मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतासह मोटार सायकल ताब्यात घेतली.
याबाबात अधिक माहिती अशी कि, आशिष प्रभु गावीत रा. भवरे ता. नवापुर यांनी नवापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते ११. ४५ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची मालकीची बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल (क्र.एम.एच-३९, एके .८१०५) ही नवापुर शहरातील लाईट बाजार भागातील राज मेन्स हेअर आर्ट दुकानासमोरकोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली आहे.
याबाबत नवापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता नवापुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार दादाभाई वाघ यांच्याकडे दिला होता पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक सचिन हिरे ,पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली,
सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचे चक्र जलद गतीने फिरवुन अधिकचीमाहीती काढुन गुन्ह्याचा छडा लावत मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार धानोरे ता. तळोदा जि.नंदुरबार येथील राहणारा किरण इंदास ठाकरे हा शनीमांडळ गावात यातील चोरीची मोटार सायकल चोरी करुन घेवून गेला आहे.
याबाबत माहीती मिळाल्याने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार,नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना माहीती दिली असता.त्यांनी पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सदरकिरण इंदास ठाकरे यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली १ लाख रुपये किमंतीची बजाजकंपनीची मोटार सायकल (क्र.एम.एच-३९,Aएके .८१०५) ही जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस स्टेशनचे पथक असई प्रमोद राठोड, पोहेकॉं दादाभाई वाघ,पोन नितीन नाईक, नामदेव राठोड, संदिप सोनवणे अशांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार दादाभाई वाघ हे करीत आहेत.