नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा शहरातील भवानी चौकात घरासमोर आरडाओरड का करतात असे विचारल्याच्या रागातून एकास लोखंडी सळईने मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील भवानी चौकातील प्रशांत शिवाजी कोळी यांनी दीपक भरत कोळी व शरद काशिनाथ कोळी यांना घरासमोर आरडाओरड करुन शिवीगाळ का करतात असे विचारले. याचा राग आल्याने दीपक कोळी व शरद कोळी यांनी प्रशांत कोळी यांना हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर दुखापत केली. याबाबत प्रशांत कोळी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दीपक कोळी व काशिनाथ कोळी यांच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.