Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे दुकान फोडून बॅटरी व इनव्हर्टर चोरी प्रकरणी 3 लाख 65 हजाराचा मुद्देमालासह दोघांना अटक

team by team
August 27, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे दुकान फोडून बॅटरी व इनव्हर्टर चोरी प्रकरणी 3 लाख 65 हजाराचा मुद्देमालासह दोघांना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील बॅटरी व इनव्हर्टर चोरी करणारे 2 संशयित आरोपी 3 लाख 65 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.सादर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर , उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती . म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता , नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते . त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले .

 

नंदुरबार शहरातील शेख मुस्तफा शेख हसन मण्यार रा . पटेलवाडी , नंदुरबार हे यांचे नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात फेमस बॅटरी ( GM ) नावाचे दुकान असून दि. 24 ऑगस्ट रोजीचे पुर्वी त्यांच्या दुकानातील 3 लाख 65 हजार 306 रुपये किमतीच्या विविध प्रकाराच्या एकुण 16 बॅटऱ्या व 14 इनव्हर्टर कोणी तरी त्यांच्या दुकानातून चोरुन नेले असल्याचे त्यांना समजल्याने त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशित केले . नंदुरबार शहरातील हाट दरवाजा परिसरातील फेमस दुकानातील बॅटऱ्या ह्या पटेलवाडी भागात राहणारा व दुकानात काम करणारा सुफियान शेख याने चोरुन नेले असल्याची गोपनीय बातमी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना मिळाल्याने सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सांगून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत सुफियान शेख यास ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले .

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील सुफियान शेख याचे बाबत गोपनीय माहिती काढली असता सुफियान शेख हा दि. 25 ऑगस्ट रोजी हाट दरवाजा परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्याठिकाणी सापळा रचून सुफियान शेख यास शिताफीने ताब्यात घेतले . ताब्यात घेतल्यानंतर त्यास फेमस बॅटरी दुकानातील चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने मागील 5 ते 6 महिन्यात फेमस बॅटरी या दुकानातून 16 बॅटऱ्या व 14 इनव्हर्टर चोरी केल्याचे कबुल केले.

 

परंतु तो त्या बॅटऱ्या कोठे ठेवलेल्या आहेत याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देत नव्हता , म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून सखोल विचारपूस केली असता त्याने त्या बॅटऱ्या व इनव्हर्टर तळोदा शहरातील मयुर भामरे यास विक्री केले असल्याचे सांगितले . त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा येथे जावून मयुर भामरे याचे कटलरी दुकानाची माहिती काढली तळोदा शहरातील हनुमान मंदीरा समोर मयुर भामरे याचे दुकान असल्याचे समजुन आले . त्या दुकानात जावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयुर अरुण भामरे रा . गुरुकुल नगर , नंदुरबार यास ताब्यात घेतले .

 

तसेच त्याच्याकडे सुफियान शेख याने दिलेल्या बॅटऱ्या व इनव्हर्टरबाबत विचारपूस केली असता तो सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देवू लागला . त्यानंतर त्यास पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यास सुफियान शेख याने दिलेल्या बॅटऱ्या व इनव्हर्टर ह्या त्याच्या दुकानाच्या मागील बाजूस ठेवलेबाबत सांगितल्याने मयुर भामरे याच्या कटलरी दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या खोलीतून 3 लाख 65 हजार 306 रुपये किमतीच्या 16 बॅटऱ्या व 14 इनव्हर्टर कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत .

 

 

सुफियान रज्जाक शेख, मयुर अरुण भामरे यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार राकेश वसावे , पोलीस नाईक राकेश मोरे , विशाल नागरे , मोहन ढमढेरे , पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत , आनंदा मराठे , रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी व तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत

Next Post

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्यास एकास विसरवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post
पत्नीबाबत अश्‍लील मागणी केल्याचा रागातनु तरुणाचा खून

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्यास एकास विसरवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add